सॅन फ्रान्सिस्को - स्वेटर ही केवळ थंडीपासून तुमचे संरक्षण करणारी वस्तू आहे, असे समजत असाल तर तो तुमचा भ्रम असेल. कारण यापुढील काळात स्वेटर माणसाचा मूड कसा आहे, हेही सांगणार आहे. म्हणजे माणसाच्या मूडप्रमाणे स्वेटरचा रंग बदलणार आहे. सॅन फ्रान्सिस्कोतील कंपनीने स्वेटरचे हायटेक डिझाइन तयार केले आहे. हे स्वेटर इतर स्वेटरपेक्षा खूपच वेगळे आहे. यावर रंगीबेरंगी एलईडी लाइट्स व सेन्सर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे स्वेटर परिधान करणा-या व्यक्तीच्या हाताचा स्पर्श झाला की त्या वेळी त्या व्यक्तीच्या मनात कोणत्या भावना प्रबळपणे उमटतील. म्हणजे स्वेटरच्या वरच्या भागातील कॉलर व आजूबाजूचा हिस्सा असेलला भाग एलईडी लाइट्सनी उजळून निघेल.
जर एखादी व्यक्ती खूपच खुश असेल तर पांढ-या रंगाचा टर्टल नेक डिझाइन हिरव्या रंगाने उजळून निघेल. जर व्यक्ती खूपच शांत असेल आणि ती सध्या स्वस्थ असेल तर स्वेटर निळ्या रंगाने उजळून निघेल. जर व्यक्तीला खूपच उत्साहित वाटत असेल तर जांभळा रंग दिसेल. स्वेटर घालणारी व्यक्ती कुणाच्या प्रेमात पडली असेल तर स्वेटरची कॉलर लाल रंगाने झगमगू लागेल. सेन्सोरीच्या संस्थापक ख्रिस्तिना नेडलिंगर यांनी सांगितले की, आम्ही खूपच हुशारीने बौद्धिक तंत्रज्ञानाऐवजी संवेदनशील तंत्रज्ञान तयार करू इच्छितो.
गॅलिव्हनिक स्किन प्रतिसाद प्रणाली
स्वेटरमध्ये वापरात येणारी गॅलव्हेनिक स्किन रिस्पॉन्स प्रणाली म्हणजे एक वेगळीच प्रतिसाद प्रणाली आहे. यात माणसाच्या शरीरातील उष्णता किंवा लवचिकपणा मोजून त्याचे विश्लेषण करते. त्यात उत्तेजित भाव दिसल्यास त्याचेही अचूक मोजमाप करता येऊ शकेल. त्याला सर्वसाधारणपणे जीएसआर नावाने ओळखले जाते. त्याला सर्वसाधारणपणे जीएसआर नावाने ओळखले जाते. या प्रणालीचा उपयोग ई-मीटर डिव्हाइसेसमध्ये केला जातो. तूर्तास या स्वेटरच्या किमतीची माहिती देण्यात आलेली नाही.
आजारांची माहिती देणारा बिछाना
न्यूयॉर्क । शास्त्रज्ञांनी आगळ्यावेगळ्या प्रकारचा एक नवा जैविक बिछाना तयार केला आहे. तो शरीरासाठी लाभदायक असून रुग्णांना त्यांच्या शरीरातील विविध आजारांची माहितीही देणार आहे. चार थर असलेल्या या बिछान्याला ट्रिटन असे नाव देण्यात आले आहे. पहिल्या थरात असलेले शेवाळ अस्थमा, अॅलर्जी, थायरॉइड यासारखे आजार दूर करू शकेल. दुस-या थरात घोड्याचे केस असून त्यामुळे शरीरातील गाठी कमी होतील. कॅक्टसपासून तिसरा थर तयार करण्यात आला असून चौथ्या थरामध्ये नारळाच्या केसरचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे शरीरातील गरम हवा बाहेर फेकली जाते. चार थरांचा हा बिछाना खूपच आरामदायी असल्याचा संशोधकांचा दावा आहे.