आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Colour Discrimination Take Life Of Indian In Scotland

वर्णभेदातून भारतीयावर स्कॉटलंडमध्ये हल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - स्कॉटलंडच्या एडिंबरा शहरात फेरफटका मारण्यासाठी निघालेल्या एका भारतीय तरुणाला वर्णभेदातून मारहाण करण्यात आली.त्याच्या चेह-यावर जखमा झाल्या आहेत.

28 वर्षीय भारतीय तरुण आपल्या दोन मित्रांसह रविवारी प्रिन्सेस स्ट्रीटवर फेरफटका मारत असताना एक उंच धिप्पाड गोरा तरुण त्याच्याजवळ आला.त्याने वर्णभेदी शेरेबाजी करून भारतीय तरुणांच्या चेह-यावर जोरदार ठोसा लगावला आणि तो पळून गेला. भारतीय तरुणाला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले.त्याच्या चेह-यावरील जखमांवर उपचार करण्यात आले. गडद रंगाचे जॅकेट आणि पँट घातलेल्या सुमारे 5 फूट 8 इंच उंचीच्या गौरवर्णीय हल्लेखोराचा आता पोलिस शोध घेत आहे.हा वर्णभेदी हल्ला असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा भाग वर्दळीचा असल्याने हल्लेखोराला कुणी पाहिले असल्याची शक्यता आहे.त्याचा शोध घेतला जात असल्याचे डिटेक्टिव्ह सार्जंट मार्क मॅक्युलॉख यांनी सांगितले.