आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअॅमस्टर्डम - नेदरलँडची महाराणी ब्रिट्रिक्स आपला मुलगा विल्यम्स अलेक्झांडरसाठी राजगादी सोडणार आहे. त्यामुळे तब्बल 122 वर्षांनंतर नेदरलँडला राजा मिळणार आहे. परंतु, अपघातामुळे वर्षभरापासून ते कोमात आहेत.
महाराणी बिट्रिक्स येत्या गुरुवारी 75 वर्षांच्या होत आहेत. 30 एप्रिल रोजी आपण राजसिंहासन सोडणार असल्याची घोषणा त्यांनी मंगळवारी दिलेल्या दूरचित्रवाणी संदेशात केली. 33 वर्षांपासून बिट्रिक्स या नेदरलँडच्या महाराणी आहेत. त्यांची आई ज्युलिया यांनीही त्यांच्यासाठी सिंहासन सोडले होते. तसे पाहता नेदरलँडमध्ये महाराणीला फारसे अधिकार नाहीत. तरीही तेथे महाराणी प्रचंड लोकप्रिय आहेत. त्या राजसिंहासन सोडतील, अशी सर्वांनाच अपेक्षा होती.
असा आहे नवीन राजा
युवराज विल्यम अलेक्झांडर 45 वर्षांचे आहेत. ते प्रशिक्षित पायलट आणि जल व्यवस्थापक आहेत. त्यांना तीन मुली आहेत. त्यापैकी एक आंतरराष्ट्रीयऑलिम्पिक समितीची सदस्या आहे, एक पायलट तर एक मुलगी जल व्यवस्थापन तज्ज्ञ आहे. युवराज विल्यम्स यांना लोक मिस्टर वॉटर म्हणूनच ओळखतात. ते तिघे भाऊ आहेत. त्यापैकी एक प्रिन्स फ्रिसो हे वर्षभरापूर्वीऑस्ट्रियात स्कीइंग करताना बर्फाच्या वादळात अडकले होते. तेव्हापासून ते कोमात आहेत.
त्यागाची परंपरा
विद्यमानऑरेंजनसाऊ राज्य 1815 पासून चालत आलेले आहे. 23 नोव्हेंबर 1890 रोजी राजा विल्यम्स तिसरे यांच्या मृत्यूनंतर त्यांची मुलगी विल्हेल्मिना गादीवर बसली होती.
सन 1948 मध्ये विल्हेल्मिनाने आपली मुलगी ज्युलियानासाठी गादी सोडली.
30 एप्रिल 1980 रोजी वयाच्या 71 व्या वर्षी ज्युलियाना यांनी बिट्रिक्ससाठी सिंहासन सोडले होते.
30 एप्रिल 2013 रोजी बिट्रिक्स युवराज विल्यम्ससाठी सिंहासन सोडणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.