आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्रजीतील ‘कॉमा’ला मिळणार पूर्णविराम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- इंग्रजी लेखनात ‘कॉमा’ म्हणजेच अल्पविरामाचा प्रचंड वापर करण्यात येतो, पण तो काढून टाकला तर भाषेचे कोणतेही नुकसान होणार नाही, असा दावा कोलंबिया विद्यापीठातील इंग्रजी आणि तुलनात्मक भाषेचे असोसिएट प्रोफेसर डॉन मॅकव्हॉर्टर यांनी केला आहे.

प्रोफेसर मॅकव्हॉर्टर यांनी इंग्रजीतील कॉमावर विस्तृत अध्ययन केले. कॉमाचा वापर बंद केल्याने आधुनिक अमेरिकी लेखनातील स्पष्टतेवर कोणताही परिमाण होणार नाही, असे त्यांचे मत आहे. इंटरनेट युर्जस आणि अनेक लेखक कॉमाचा वापरच करत नाहीत. त्यामुळे कॉमाचा वापर बंद केला तर त्याचे स्वागतच केले जाईल, असेही मॅकव्हॉर्टर यांनी म्हटले आहे. तुम्ही आधुनिक इंग्रजी साहित्य वाचा. त्यात तुम्हाला कॉमाच्या वापराबाबत कोणतीही अडचण भासणार नाही. हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या संयोगातून पाणी तयार होते हे आपणाला माहीत आहे. ते पूर्णत: वैज्ञानिक तथ्यांवर आधारित आणि तार्किक आहे, परंतु कॉमाच्या बाबतीत अशी कुठलीही तार्किकता सिद्ध करता येत नाही. अशा पद्धतीच्या गोष्टी केवळ फॅशन आणि परंपराच असतात आणि काळानुरूप त्या बदलूनही जातात, असे मॅकव्हॉर्टर यांनी म्हटल्याचे वृत्त ‘द टाइम’ने दिले आहे.