आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Commander Of ISIS Vowed War Against India And Many Countries

ISIS चा नवा व्हिडीओ : कमांडर बद्रीने पुकारली भारताविरुद्ध 'जंग'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - इराकमध्ये हिंसाचार घडवणारी दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट इन इराक अँड अलशाम (आयएसआयएस) चा कमांडर इब्राहीम अव्वद अल-बद्री याने भारतासह अनेक देशांच्या विरोधात युद्धाची घोषणा केली आहे. मुस्लिमांवर होणारे अत्याचार सहन केले जाणार नसल्याचे त्याने म्हटले आहे. आयएसआयएसच्या 'घोषणापत्रा'मध्ये भारताचा उल्लेख आल्याने इराकमध्ये अडकलेल्या शेकडो भारतीयांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. इराकच्या अनेक मोठ्या शहरांमध्ये शेकडो भारतीय अडकलेले आहेत.

रमजानच्या भाषणामध्ये अल बद्री याने आपल्या समर्थकांना या पवित्र महिन्यात शस्त्र हाती घेण्याचे आवाहन केले आहे. तो म्हणाला, ' अल्लाहच्या शत्रुंमध्ये दहशत निर्माण करा, आणि ते भेटतील त्या ठिकाणी त्यांना मृत्यूची शिक्षा द्या'
हे भाषण मंगळवारी सायंकाळी उशीरा इंटरनेटवर प्रसारीत करण्यात आले. इब्राहीम अव्वद अल-बद्रीचे दुसरे नाव अबू बक्र अल-बगदादी असे आहे.

अल-बद्री म्हणाला, 'चीन, भारत, पॅलेस्टाईन, सोमालिया, कॉकेशस, सिरिया, इजिप्त, इराक, इंडोनेशिया, अफगाणिस्तान, फिलिपाईन्स, अहवाज, ईराण, पाकिस्तान, ट्यूनिशिया, लिबीया, अल्जेरिया, मोरक्को यासह पश्चिमेकडील अनेक देशांमध्ये मुस्लिमांच्या अधिकारांचे हनन होते आहे. कैद्याप्रमाणे जीवन जगणा-या आपल्या नागरिकांना मदतीची गरज आहे. अनाथ आणि विधवा तक्रारी करत आहेत. मशीदी अपिवित्र केल्या जात आहेत. संपूर्ण मुस्लीम समाज जेहाद पाहत आहे. त्यामुळे यातना सहन करणा-या आपल्या भावंडांना जेहादमध्ये सहभागी करून घ्या.'
आयएसआयएसने अल बद्रीचे हे भाषण इंग्रजी, रशियन, फ्रेंच, अल्बानि आणि अरबी भाषेत प्रसारीत केले आहे. त्यामुळे जगभरात आपली दहशत पसरवणे हा आयएसआयएसचा उद्देश असल्याचे यावरून दिसते आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच आयएसआयएसने इराक आणि सिरियाच्या त्यांच्या ताब्यात असलेल्या परिसराला इस्लामीक राष्ट्र घोषित केले होते.