आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Commandos Killed By Firing Bullet Who Did In Laden Compaign

लादेनला मारणा-या नेव्ही सील कमांडोची गोळी घालून हत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावलेले नेव्ही सील कमांडो क्रीस केल यांची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे.

एका माजी नौदल सैनिकाने त्यांना गोळी घातली. अमेरिकेचे ते सर्वोत्‍कृष्‍ट स्नायपर म्हणून परिचित होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत 150 दहशतवाद्यांना ठार केले होते. एवढ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा हा अमेरिकेतील एक विक्रम आहे. ‘अमेरिकन स्नायपर’ पुस्तकामुळे केल जगासमोर आले होते. या प्रकरणात पोलिसांनी एडी रे रूथ नावाच्या माजी नौदल सैनिकाला अटक केली आहे. रूथ पोस्टट्रॉमेटिक स्ट्रेस सिंड्रोम या मानसिक आजाराने ग्रस्त आहे. पुस्तकाचे सहलेखक मॅक इव्हेन यांनी केल यांच्या हत्येच्या घटनेस दुजोरा दिला आहे. टेक्सास येथील रफ क्रीक लॉजच्या शूटिंग रेंजमध्ये शनिवारी अन्य एका व्यक्तीसोबत त्यांचा मृतदेह आढळून आला. केल यांनी 1999 ते 2009 या कालावधीत नौदलात काम केले. त्यानंतर त्यांनी क्राफ्ट इंटरनॅशनल नावाच्या एका फर्मची स्थापना केली होती.