आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉम्प्युटर प्रोगामर अँरोनची आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - तरुण कॉम्प्युटर प्रोग्रामर अँरोन स्वार्त्झने (26) संभाव्य दंड आणि शिक्षेच्या भीतीतून आत्महत्या केली. त्याने मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजी व (एमआयटी) सायंटिफिक र्जनल्सच्या आर्काइव्हमधून सुमारे 40 लाख दस्तावेज जाहीर केले होते. या प्रकरणात स्वार्त्झला किमान 50 वर्षांची शिक्षा आणि सुमारे 21 कोटी रुपयांचा दंड भरावा लागला असता. अमेरिकेची न्यायव्यवस्था हीच स्वार्त्झच्या मृत्यूचे कारण ठरली आहे. त्याच्या कृत्यामुळे कोणाचेही नुकसान होणार नव्हते, अशा कृत्यासाठी त्याला शिक्षा दिली जाणार होती, असे स्वार्त्झच्या कुटुंबाने म्हटले आहे. स्वार्त्झने 14 व्या वर्षीच रिच साइट समरी (आरएसएस) फॉरमॅट विकसित केला होता. इंटरनेटवर खुले दस्तावेज असावेत, असे अँरोनचे मत होते.