दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष आणि मानवमुक्तीच्या लढ्याचे उत्तुंग नेते डॉ. नेल्सन मंडेला यांच्या स्मरणार्थ मंगळवारी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे. जोहान्सबर्गच्या सोव्हेटे येथील सॉकर सिटीच्या एफएनबी स्टेडियम होणा-या या श्रद्धांजली सभेसाठी जगभरातील नेते दक्षिण आफ्रिकेत येत आहेत. जगाच्या इतिहासातील नजिकच्या काळातील ही सर्वात मोठी शोकसभा ठरणार आहे. 5 डिसेंबर रोजी मंडेला यांचे निधन झाले.