(फोटो - घटनास्थळावरुन पुरावे गोळा करताना अधिकारी.)
किंशासा- आफ्रिकी देश कांगोमध्ये ISIS चा दहशतवादी समजून लोकांनी एका व्यक्तीला दगडांनी ठेचून मारले. त्यानंतरही जनतेचा राग शांत झाला नाही. मृतदेहाला भाजून त्याचे बारीक बारीक तुकडे करुन त्यावर ताव मारला. कांगोतील उत्तर-पूर्व वस्तीत ही घटना घडली आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले, की एक माणूस संशयास्पदरीत्या हातात कु्रहाड घेऊन उभा होता. तो इतरांपेक्षा अगदी वेगळा दिसत होतो. तो स्थानिक भाषा स्वाहिलीही बोलत नव्हता. त्यानंतर तो बसमध्ये चढला. लोकांनी त्याला बसमधून खाली उतरवले. त्याला दगडांनी ठेचून ठार मारले. त्याचा मृतदेह भाजून मांस खाल्ले.
बदला घेण्यासाठी केले कृत्य
गेल्या काही दिवसांमध्ये कांगोच्या उत्तर-पूर्व वस्तीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 100 हून जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याचा बदला घेण्यासाठी स्थानिक लोकांनी या व्यक्तीला ठार मारले. लोकांचा संशय आहे, की दहशतवादी कृत्यांमागे युगांडाच्या लोकांचा हात आहे. ते हातात कुरहाड ठेवतात.
पुढील स्लाईडवर बघा, घटनास्थळाची छायाचित्रे.....