आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील तरूणांना कॉंग्रेसतर्फे मोफत मिळणार 'व्हॉट्स अ‍ॅप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - 2014 च्या निवडणुकांमध्ये तरुणांची मते मिळवण्यासाठी काँग्रेसतर्फे देशातील तरुणांना व्हॉट्स अ‍ॅप चॅटिंग मॅसेंजरचे सबक्रिप्शन मोफत दिले जाणार आहे. व्हॉट्स अ‍ॅप ही एक लोकप्रिय स्मार्टफोन मॅसेंजर सेवा आहे. काही काळ ही सेवा मोफत असते. त्यानंतर शुल्क आकारले जाते. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांच्या मते, ही योजनाही डायरेक्ट कॅश ट्रान्सफरसारखीच असेल.

या योजनेत आम्ही व्हॉट्स अ‍ॅपला पैसा ट्रान्सफर करणार आणि त्यांच्याकडून तरुणांना मोफत चॅटिंगची सुविधा उपलब्ध होईल. ज्या तरुणांची मोफत व्हॉट्स अ‍ॅप वापरण्याची मुदत संपली आहे आणि जे या सेवेसाठी शुल्क भरत आहेत त्यांचे शुल्कही पक्षातर्फे भरले जाईल. वर्षाला 0.99 डॉलर शुल्क भरून काँग्रेस अगदी स्वस्तात भारतीय तरुणांना आकर्षित करणार आहे.