ह्युस्टनमध्ये राहणा-या एमिली आणि कॅटलिन या दोन बहिणींची कथा वेगळी आहे. दोघींचा जन्म एकाच वेळी झाला. त्यांचे लिव्हर एकमेंकांना जोडलेले होते. तेव्हाच डॉक्टर्संनी सांगितले होते, की त्या जास्त काळ जिवंत राहणार नाही. दोन लाखात अपवादात्मक एमिली आणि कॅटलिनसारखे केस पुढे येत असतात. दोघी 10 महिन्यांच्या झाल्यानंतर बाल तज्ज्ञ डॉ केविन लॅलीने दोघींना वेगळे करण्याची जोखिम उचली आणि यशस्वी केली. आज त्या 18 वर्षांच्या झाल्या आहेत.
दोघींनी केविनबरोबरच आपला 18 वा वाढदिवस साजरा केला. दोन्ही बहिणींनी पदवी मिळवली आहे. आम्हाला माहित नाही. पण आमच्यासाठी वाढदिवस खूप महत्त्वाचा आहे. जगात थोडी चांगली डॉक्टर्सही असतात. 18 व्या वर्षात माणूस तारूण्यात प्रवेश करतो. देव आणि आई-वडील यांच्या आशीर्वादामुळे चांगले दिवस पाहायला मिळाले, असे एमिल आणि कॅटलिनने सांगितले.
मला तो दिवस आठवतो, जेव्हा मला कळाले होते की मी दोन जुळ्या मुलींची आई होणार तेव्हा आधुनिक उपचार पध्दती अस्तित्वात नव्हते, असे त्यांच्या आईने सांगितले.
पुढील स्लाइड्सवर पाहा जुळ्या बहिणींचे बालपणातील छायाचित्रे....