आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Contact Re established With Russian Satellite Carrying Geckos

फुलपाखरांचा उपग्रह पडता-पडता बचावला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को - रशियाच्या शास्त्रज्ञांनी पाल,किटक पाठवलेला उपग्रह पृथ्वीवर पडण्यापासून रोखला आहे. रशियाने 19 जुलै रोजी त्याचे प्रक्षेपण केले होते. त्यानंतर त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता.
या उपग्रहाला उच्च कक्षेत स्थिर करण्यात शास्त्रज्ञांना अपयश आले होते. त्यामुळे उपग्रह पृथ्वीवर पडेल, अशी शक्यता वर्तविली होती. असे असले तरी तीन दिवसांच्या प्रयत्नानंतर त्यांनी त्यावर पुन्हा नियंत्रण मिळवले. रशियन अंतराळ संशोधन संस्था रॉसकॉस्मॉसने मंगळवारी सहा टन वजनाचा उपग्रह चार महिन्यांपर्यंत राहू शकतो, असे जाहीर केले आहे. रशियाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकोबायोलॉजिकल प्रॉब्लेम्स (आयएमबीपी) ओलेग वोलेशिन यांनी त्यास दुजोरा दिला आहे. गेको प्रयोगाशी संबंधित उपकरण स्वयंचलित प्रणालीच्या योजनेनुसार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

अंतराळात पाली
या उपग्रहाच्या माध्यमातून पाच मोठ्या पाली, कीट,फुलपाखरू आणि मशरूम अंतराळात पाठवण्यात आल्या आहेत, त्यामुळे या उपग्रहाला पालीचा उपग्रह संबोधले जात आहे. अंतराळातील भारहीनतेचा त्यांच्या सेक्स जीवनावर तसेच त्यांच्या कार्यपद्धतीवर काय परिणाम होतो हे यातून जाणून घेतले जाईल.