आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Continue Unrest In Hong Kong For Democracy, Divya Marathi

लोकशाहीसाठी आंदोलन: ‘हाँगकाँग ऑक्युपाय’च्या कार्यकर्त्यांचा ठिय्या सुरूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाँगकाँग - लोकशाही मूल्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या हाँगकाँगमधील आंदोलनकर्त्यांनी बुधवारी हे लोण ‘फुलाच्या गंधा’प्रमाणे सर्वत्र पसरेल, अशा शब्दांत आपल्या भावना मांडल्या. त्याचबरोबर यातून नागरिकांनी सरकारला एक प्रकारे मागे हटणार नसल्याचा इशारा दिला.

व्यापारदृष्ट्या हाँगकाँग शहर अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. आंदोलनामुळे शहरातील बहुतेक सर्व रस्ते निदर्शकांनी व्यापल्याचे दिसून येते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मीडियाने या आंदोलनाला ‘हाँगकाँग ऑक्युपाय’ असे म्हटले आहे. सरकारने आपली भूमिका बदलली नाही तर त्याचे लोण आणखी पसरेल, असे ऑक्युपाय सेंट्रलचे प्रमुख चान कीन यांनी स्पष्ट केले आहे. निदर्शकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असूनही सरकारने आपला अहंकार बाजूला ठेवलेला नाही. सरकारने आपली वागणूक बदलली पाहिजे. लोक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होत आहेत, ही बाब सरकारच्या लक्षात यायला हवी, असे कीन म्हणाले. ऑक्युपाय सेंट्रल ही जनआंदोलनातील महत्त्वाची संघटना आहे.

लोकशाहीसाठी नागरिक उतरले रस्त्यावर
* राष्ट्रीयदिनी निषेध
बुधवारी चीनचा राष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने सर्व सरकारी कार्यालये बंद होती. सरकारने तीन दिवसांपर्यंत आंदोलकांच्या मागण्यांकडे कानाडोळा करून त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. परंतु राष्ट्रीय दिनी हाँगकाँग शहरात सरकारविरोधी घोषणाबाजी ऐकायला मिळाली.

* तीन दिवसांपासून ठिय्या
हाँगकाँगमधील महत्त्वाच्या तीन व्यापारी ठिकाणांवर हजारो नागरिक एकत्र जमले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून नागरिक या भागात ठिय्या करून आहेत.

* सनदशीर कृती
हाँगकाँगमधील नागरिकांची आम्ही माफी मागतो. परंतु आमचा मुद्दा समजून घ्या. नागरिकांची गैरसोय करण्याचा हेतू नाही. व्यवस्था बदलावी, असे वाटते. सनदशीर मार्गाने हे आंदोलन सुरू आहे.

* जाचक फर्मान आणि स्वायत्ततेची मागणी
हाँगकाँगमध्ये निवडणूक लढवू इच्छिणा-या उमेदवारांना चीनच्या समितीची परवानगी घ्यावी लागेल, असे सरकारी फर्मान आहे. हा आदेश जाचक आहे, असे लोकशाही समर्थकांचे म्हणणे आहे. त्यांनी एकजूट झाले आहेत. हाँगकाँगच्या लोकांना स्वायत्तता हवी आहे. त्यांना हा आदेश मान्य नाही.