आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Contraceptive Pills And Condoms Total Free For UK School Girls

शाळांमध्ये मोफत कंडोम! किशोरवयात गर्भवती होणार्‍या विद्यार्थिंनींचे प्रमाण वाढले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- लंडनमध्ये अलिकडे किशोरवयातच गर्भवती होणार्‍या विद्यार्थिनींचे प्रमाण खूप वाढले आहे. या प्रकारावर अंकुश लावण्यासाठी लंडन सरकारने नवी शक्कल लढविली आहे. लंडनमधील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत कंडोम वाटप करण्‍याच्या सूचना देण्यात आल्या आहे. या योजनेनुसार किशोरवयातील विद्यार्थिंनी मॉनिंग पिल्स आणि विद्यार्थ्यांना कंडोमचे वाटप केले जात आहे.

'नॅशनल इंस्टिट्यूट फॉर हेल्थ अॅण्ड केअर एक्सीलेंस' नव्या मार्गदर्शकतत्त्वानुसार, 25 आणि त्यापेक्षा आत असलेल्या विद्यार्थिंनींना गर्भनिरोधक आणि आययूडीचा वापर कसा करावा, याबाबत ज्ञान असणे आवश्यक आहे. प्राध्यापकांनी त्यांना याबाबत मार्गदर्शन करायला हवे. त्यामुळे युके सरकारने शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत कंडोम वाटण्याचा फंडा सुरु केला आहे.

दरम्यान, अंडर 18 विद्यार्थिनींमध्ये गर्भधारणेचे प्रमाण कमी असले तरी अंडर 25 मध्ये हे प्रमाण वाढले आहे. 'नाइस'ने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार किशोरवयात गर्भवती होणार्‍या विद्यार्थिनीचे प्रमाण इंग्लंडमध्ये मोठे आहे. त्यामुळे शाळांमध्ये किशोरवयीन विद्यार्थिंनीना मोफत मॉनिंग पिल्स आणि विद्यार्थ्यांना कंडोम वितरीत केले जात आहे.