आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारचा वेग मर्यादेबाहेर जाताच ब्रेक लागणार.....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रान्स किंवा जर्मनीतील वाहन चालकांना भविष्यात कधीही मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवता येणार नाही. युरोपीय संघांद्वारे एक नवा नियम लागू केला जात आहे. त्यानुसार प्रत्येक कारमध्ये कॅमेरे लावणे अनिवार्य करण्यात येणार असून त्याद्वारे मर्यादेपेक्षा अधिक वेगाने कार चालवणा-या चालकाला रोखले जाणार आहे. एका प्रस्तावानुसार नव्या कारमध्ये लावण्यात येणारे रस्त्याच्या बाजूला लावलेली चिन्हे वाचू शकतील. त्यानंतरही चालकाने कारचा वेग मर्यादेबाहेर वाढवल्यास कारमधील यंत्रणेद्वारे आपोआप ब्रेक दाबले जातील. दुस-या एका पद्धतीनुसार टेक-सेव्ही ऑटोमोबाइल्स सॅटेलाइटद्वारे चालणा-या कारवर थेट नियंत्रण ठेवता येऊ शकते. उदाहरणार्थ- हा प्रस्ताव पारित झाल्यानंतर ब्रिटनमध्ये ताशी 112 किलोमीटर वेगापेक्षा अधिक वेगाने कार चालवता येणार नाही. युरोपातील परिवहन अधिका-यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने 2020 पर्यंत रस्त्यांवरील अपघातांची संख्या एक तृतीयांश टक्क्यांनी कमी करायची आहे. युरोपीय संघात दरवर्षी रस्त्यावरील अपघातात 30 हून अधिक लोकांचा मृत्यू होतो तर अशा दुर्घटनांमध्ये 15 लाखांपेक्षा जास्त लोक जखमी होतात.
slate.com