आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयफोनद्वारे करा टीव्ही कंट्रोल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयफोनद्वारे रिमोटचाही वापर करून घेण्यासाठी वापरकर्त्यांना टीव्ही संच आणि एक अँपल उपकरणाची गरज असेल. त्याचबरोबर एक वायरलेस रुटर (पील) आणि पील केबलची गरज पडेल. हा रुटर घरातील वाय-फाय रुटरच्या ओपन अँथरनेट पोर्टशी लिंक असेल.
वतरुळ निश्चित असणे गरजेचे - हे एक वायरलेस प्रोटोकॉल तंत्रज्ञान आहे. याचा वापर कनेक्टिव्हिटीसाठी केला जातो. हे तंत्रज्ञान 25 फुटांच्या वतरुळात असणे आवश्यक आहे. हे पील उपकरण टीव्ही संचासाठी सर्व काम करतो. त्यामुळे त्याला संचाच्या जवळ ठेवले जाते. वापरकर्त्याला अँप स्टोअरमधून मोफत पील अँप डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर आयफोन रिमोट प्रमाणे काम करायला लागेल.
कार्यक्रम निवडा
- याच्या योग्य वापरासाठी पीलवर आवडते कार्यक्रम सेट करावे लागतील. पीलचे सहसंस्थापक बालाकृष्णन यांच्या मते, काय चांगले येत आहे, याचा शोध घेण्यातच आपला संपूर्ण वेळ जातो. हे काम दिवसेंदिवस आणखी कठीण होत चालले आहे. अशावेळी पीलद्वारे आवडते कार्यक्रम पाहण्याचा सल्ला मिळू शकतो. याच्या मदतीने तुम्ही ट्विटर किंवा फेसबुकवर मित्रांसोबत शेअरिंग करू शकता. सोशल नेटवर्किंगच्या सुविधेसह तुमचे मित्र त्यावेळी काय पाहत आहेत, हेसुद्धा पील सांगतो.
पँडोरा रेडिओसारखे - हा पील अनेक बाबतीत अत्यंत नेटफ्लिक्स आणि पँडोरा रेडिओप्रमाणे काम करतो. नेटफ्लिक्स मुव्ही रेंटल आणि ऑनलाइन व्हिडियो स्ट्रिमिंग सर्व्हिस आहे. तसेच पँडोरा रेडिओने अमेरिकेत क्रांतिकारी इंटरनेट रेडिओ सादर केला आहे. याच्या मदतीने तुम्हाला आपले आवडते कार्यक्रम निश्चित करता येतील.