आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोपने धुतले मुस्लिम महिला कैद्याचे पाय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोम- नवे पोप फ्रांसिस वादात अडकले आहेत. पोप गुरुवारी 'मास ऑफ द लॉर्ड्स सुपर'साठी रोमच्‍या कॅसल डेल मारमो सुधारगृहात गेले. तिथे त्‍यांनी कैद्यांसोबत भोजन ग्रहण केले आणि 12 अल्‍पवयीन कैद्यांचे पाय धुतले. या कैद्यांमध्‍ये दोन महिलांचा समावेश होता. त्‍यापैकी 1 महिला मुस्लिम होती.

नव्‍या पोपनी केलेला हा प्रकार अनेक लोकांना आवडलेला नाही. चर्चच्‍या निय‍मानुसार पुरुषांना 'होली थर्सडे'वर प्रतिबंध आहे. यापूर्वी एकाही पोपने महिला कैद्याचे पाय धुतले नव्‍हते. त्‍यामुळे पोपनी नियम का तोडला, यावरुन परंपरावद्यांमध्‍ये वाद सुरु झाला आहे. तर उदारमतवाद्यांनी मात्र पोपच्‍या या पुढाकाराचे स्‍वागत केले असून चर्चच्‍या सर्वसमावेशकतेचा हा संकेत असल्‍याचे म्‍हटले आहे.