आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Convicted Qaeda Terrorist Claims Saudi Royals Involved In 9 11 Attacks

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सौदीच्या शाही परिवाराची ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यास फंडिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेवरील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यामागे सौदी अरेबियाच्या शाही परिवाराचा हात असून कुटुंबातील काही सदस्यांनी हल्ल्यासाठी पैसा पुरवला. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे विमान पाडण्याचाही त्यांचा कट होता, असा दावा अल-कायदाच्या कैदेतील एका दहशतवाद्याने केला आहे. त्यामुळे अमेरिकी तपास अधिकारी हादरले आहेत.

अल-कायदाच्या या दहशतवाद्याचे नाव जिकरिया मोसावी असून तो कोलोराडो येथील अति सुरक्षा असलेल्या तुरुंगात कैद आहे. त्याने एका मुलाखतीमध्ये हा दावा केला. प्रिन्स तुर्की अल फैजल अस साद यांच्यासह सौदी अधिकारी, गुप्तहेर विभागाचे प्रमुखांनी अल-कायदाला मदत केली. अनेक वर्षे त्यांच्याकडून ही मदत मिळाल्याने अल-कायदाची अमेरिकेवर हल्ला करण्याची हिंमत होऊ शकली, असे अतिरेक्याचे म्हणणे आहे. मोसावीने अफगाणिस्तानातील अमेरिकेतील दूतावासामध्ये काम करणार्‍या सौदी अधिकार्‍यांना भेटल्याचाही दावा केला आहे.