आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cop Accidentally Shoots Himself In Front Of His Wife

Video: बंदूक खिशात ठेवताना पोलिस अधिका-याने स्वतःलावरच झाडली गोळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओहियो - अमेरिकेच्या ओहियो प्रांतात एक आश्चर्यकारक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. येथील कॅन्टकी येथील एका पोलिस अधिका-याकडून त्याला स्वतःलाच गोळी लागली. पोलिस अधिकारी डेरिल जाउट आणि त्यांची पत्नी सिनसिनाटी येथे डीनरनंतर कार पार्किंगमध्ये जात असताना त्यांनी जॅकेटमधून सेमी ऑटोमॅटिक हँडगन काढली आणि ती ठेवण्याचा प्रयत्न करत असताना ही दुर्घटना घडली.

ही गन खिशात ठेवताना चुकून गोळी झाडली गेली आणि ती डेरील यांच्या पोटात लागली. त्यानंतर डेरील लगेच खाली कोसळले. घाबरलेल्या अवस्थेत त्यांची पत्नी फोन लावू लागली. पण फोन लागत नसल्याने त्या सिग्नल मिळावा म्हणून बाहेर पडल्या. दरम्यान डेरील उठण्याचा बराच प्रयत्न करत होते पण त्यांना ते शक्य होत नव्हते. अखेर ब-याच प्रयत्नांनंतर ते उठू शकले आणि चालत लिफ्टबाहेर आले.

डेरिल यांच्यावर यूनिव्हर्सिटी ऑफ सिनसिनाटी मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारचा धोका नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा घटनेचे PHOTO आणि अखेरच्या स्लाइडवर पाहा VIDEO