आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेरूमध्ये सापडल्या पालीच्या दोन नवीन प्रजाती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - पेरूमध्ये पालीची नवीन प्रजाती सापडल्या आहेत. हिरवा आणि भुर्‍या रंगाचे पट्टे असलेली ही पाल संशोधकांनी शोधून काढली आहे. ईशान्य पेरूकडील अँडेस पर्वत रांगेत ही प्रजात दिसून आली आहे. अ‍ॅझुल नॅशनल पार्कमध्ये या प्रजातीचे दोन जीव दिसले आहेत. हे उद्यान पेरूमधील सर्वात मोठे उद्यान आहे. दुसरी प्रजात प्रदेशातील एका नदीच्या खोर्‍यात सापडली.