आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Coup In Thailand: Military Seizes Control Of Country, News In Marathi

थायलंडवर अखेर लष्कराचा ताबा; आणीबाणीच्या दोन दिवसांनंतर भूमिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक- देशात सहा महिन्यांपासून असलेल्या अस्थिरतेच्या नावावर लष्कराने अखेर गुरुवारी सरकारी यंत्रणा ताब्यात घेत असल्याचे जाहीर केले. लष्करप्रमुखांनी ही घोषणा केली.

देशातील कायदा-सुव्यवस्था सुरळीत राहावी आणि शांतता लवकर प्रस्थापित व्हावी यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत. गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजेपासून देशाचा कारभार लष्कराच्या ताब्यात गेला आहे, असे लष्करप्रमुख प्रायुत चान-ओ-चा यांनी स्पष्ट केले. नागरिकांचे बंड आणि संघर्ष यातून निर्माण झालेली स्थिती सुधारण्यासाठी आणीबाणी लागू करण्यात आल्याच्या दोन दिवसांनंतर लष्करी राजवटीची घोषणा झाली आहे. त्या वेळी लष्करी राजवट नसल्याचा दावाही होता.

लष्करशाहीची प्रदीर्घ परंपरा
थायलंडला प्रदीर्घ काळापासून लष्करशाहीची परंपरा राहिली आहे. लोकनियुक्त सरकार उलथून 1932 पासून देशाने 11 वेळा लष्करी राजवट पाहिली आहे. थायलंडचा कायदा विशिष्ट परिस्थितीत लष्कराला देशातील कारभारात हस्तक्षेप करण्याची परवानगी देतो. 1914 चा हा कायदा आहे, असे सांगून लष्कराने आणीबाणी आणली. त्यापाठोपाठ आता लष्करी राजवटही लादली.