Home »International »Other Country» Court Could Swear In Ailing Chavez

शॅवेझ शपथ न घेताही सत्तेवर, आजारपणामुळे हजर राहण्याची शक्यता कमी

वृत्तसंस्था | Jan 06, 2013, 00:33 AM IST

  • शॅवेझ शपथ न घेताही सत्तेवर, आजारपणामुळे हजर राहण्याची शक्यता कमी

कॅराकस- व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो शॅवेझ गुरुवारी होणा-या शपथविधी समारंभाला आजारपणामुळे हजर राहू शकले नाही तरी ते सत्तेवर राहतील, असे सरकारी पातळीवर स्पष्ट करण्यात आले आहे. शॅवेझ यांची ही चौथी टर्म असेल.


उपराष्ट्राध्यक्ष निकोलस मॅडुरो यांनी ही बाब स्पष्ट केली. शॅवेझ यांना सर्वाच्च न्यायालयाकडून नंतर यथावकाश शपथ देण्यात येईल, असे मॅडुरो यांनी सांगितले. शॅवेझ हजर राहणार नसतील तर नवीन निवडणुकीची मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे. ती मागणी मॅडुरो यांनी फेटाळून लावली. शॅवेझ कर्करोगाचा मुकाबला करत आहेत. क्यूबामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून शुक्रवारी त्यांना फुप्फुसाला संसर्ग झाल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या तीन आठवड्यापासून शॅवेझ यांचे सार्वजनिक जीवनातील दर्शन दुर्मिळ झाले आहे. विरोधकांनी मात्र सत्तेची सूत्रे संसदेच्या अध्यक्षांकडे सोपवण्याची मागणी लावून धरली आहे. कोणत्याही परिस्थितीत तीस दिवसांच्या आत निवडणुका घेतल्या जाव्यात, अशी मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात आली. शॅवेझ शपथविधी समारंभाला उपस्थित रहाणार नाहीत, ही गोष्ट जाहीर करण्याचे कोणतेही कारण अद्याप आमच्यासमोर नसल्याचेही मॅडुरो यांनी गुरुवारी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला; परंतु तसेच काही घडले तर तो विषय सर्वाच्च न्यायालयाच्या साक्षीने दूर करण्यात येईल, असे मॅडुरो म्हणाले. शॅवेझ यांची राष्ट्राध्यक्ष पदावर निवडून येण्याची चौथी वेळ आहे. विरोधकांनी सत्ता सोडून ती संसद अध्यक्षांकडे सोपवण्याची मागणी केली असली तरी राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्राध्यक्ष आणि सभागृह नेते डिओदादो कॅबेलो यांनी आपली एकजूट दाखवली आहे.

कायदा काय म्हणतो ?
शॅवेझ यांना 10 जानेवारीपासून सत्ता हाती घेणे राज्यघटनेनुसार अनिवार्य आहे. घटनेच्या कलम 231 नुसार संसदेत किंवा सर्वोच्‍च न्यायालयासमोर शपथ घेतल्याशिवाय कोणत्याही निर्वाचित व्यक्तीला राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेता येत नाहीत. काही कारणाने व्यक्ती शपथ घेण्यास असमर्थ असेल तर त्या जागी उपराष्ट्राध्यक्षांकडे देण्याची तरतूद राज्यघटनेत आहे.

Next Article

Recommended