आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Court Forces Out Thai PM, Part Of Her Cabinet News In Marathi

केवळ एका अधिकाऱ्याच्या बदलीवरून पडले थायलंडच्या यिंगलूक शिनवात्रा यांचे सरकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॅंकॉक- थायलंडच्या पंतप्रधान यिंगलूक शिनवात्रा यांना त्यांच्या मंत्रिमंडळासह पायउतार होण्यास आज (बुधवार) सांगण्यात आले. त्यांच्यावर घटनात्मक न्यायालयाने पदाचा गैरवापर केल्याचा ठपला ठेवला आहे. शिनवात्रा यांनी राजीनामा दिल्याने थायलंडमध्ये राजकीय वादळ उठले आहे.
2011 मध्ये थायलंड प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याची वशीला लावून बदली केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यांच्या प्रतिष्ठित राजकीय कुटुंबाला मदत करण्यासाठी या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली होती, असे घटनात्मक न्यायालयाने सांगितले आहे. यामुळे घटनेतील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाले आहे. शिनवात्रा यांनी या आरोपाचा इन्कार केला आहे.
थायलंडच्या शासकीय वृत्तवाहिनीवर तब्बल 90 मिनिटे लाईव्ह प्रसारण करण्यात आलेल्या न्यायालयाच्या आदेशात सांगण्यात आले आहे, की शासकीय अधिकाऱ्याची बदली करताना नैतिक मुल्ल्यांची जपवणूक होणे आवश्यक आहे. छुपा अंजेडा समोर ठेऊन अधिकाऱ्याची बदली करणे योग्य नाही. शासकीय अधिकाऱ्याची बदली करून स्वतःचा आणि कुटुंबीयांचा फायदा करून देणे शिनवात्रा यांचा उद्देश होता. यामुळे घटनेच्या 268 कलमाचे उल्लंघन झाले आहे.
शिनवात्रा यांच्या जागी कोण देशाची धूरा सांभाळेल याची घोषणा लगेच करण्यात आलेली नाही. शिनवात्रा यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळालाही राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, कोण आहेत यिंगलूक शिनवात्रा...