आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकैरो - गेल्या वर्षी फुटबॉल सामन्यात झालेल्या हिंसाचाराच्या खटल्यात दोषींना देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेला इजिप्तमध्ये प्रचंड विरोध झाला. न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उसळलेल्या हिंसाचारात किमान 35 जण ठार झाले आहेत. न्यायालयाच्या निकालानंतर पोर्ट सईद मैदानावर संतप्त लोकांची गर्दी झाली होती. न्यायालयाने ज्या आरोपींना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली होती त्यांचे समर्थक आणि पोलिस यांच्यात ही धुमश्चक्री झाली. शुक्रवारी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. राष्ट्राध्यक्षांनी जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप आहे. शनिवारी खटल्याचा निकाल जाहीर झाला. त्यातील 21 जणांना फाशी ठोठावण्यात आली. उर्वरित दोषींना 9 मार्च रोजी शिक्षा ठोठावली जाणार आहे.
प्रकरण काय ?
गेल्या वर्षी पोर्ट सईद स्टेडियमवर लीग फुटबॉल सामना आयोजित करण्यात आला होता. सामन्यानंतर दंगल उसळली होती. फुटबॉलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी हिंसक घटना ठरली होती. स्थानिक टीम अल-माजरीचे समर्थक मैदानावर उतरले होते. त्यांनी कैरो क्लबच्या अल-अहलीच्या समर्थकांवर जोरदार दगडफेक केली होती.
‘अल-अहली’चा मुबारकांनाही धक्का
गेल्या वर्षी झालेल्या सामन्यानंतरच्या दंगलीत 74 जणांचा मृत्यू झाला होता.अल-अहली टीम समर्थकांचा मृतांमध्ये समावेश होता. त्याचा राग व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी समर्थकांनी माजी राष्ट्राध्यक्ष मुबारक विरुद्ध मोठ्या स्तरावर निदर्शने केली होती.
हिंसाचार सुरूच
राजधानी कैरोमधील तहरीर चौकात निदर्शनास सुरुवात झाली. सुरुवात रॅलीने झाली, परंतु त्याचे रूपांतर हिंसाचारात झाले. आंदोलक आणि पोलिस भिडले. त्यात इजिप्तच्या 27 प्रांतातील 12 प्रदेशांत आंदोलन झाले. हिंसाचार भडकला. त्याच वेळी स्वेज शहरात झालेल्या हिंसाचारात सहा लोकांचा मृत्यू झाला. इस्लामियामध्ये मुस्लिम ब्रदरहुड पार्टीच्या मुख्यालयाला पेटवून देण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.