आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Court Upset Over Late Arrival By Parvez Musharraf

‘वाट बघण्यासाठी बसलो नाहीत’; मुशर्रफांना फटकारले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ जामिनाचा कालावधी वाढवण्यासाठी शुक्रवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयासमोर हजर झाले; परंतु अर्धा तास उशिराने. त्यावर न्यायालयाने त्यांना अगोदर चांगलेच फैलावर घेतले व नंतर जामीन सहा दिवसांनी वाढवला.

पाकिस्तानात 2007 मध्ये आणीबाणी लागू करून 60 न्यायाधीशांना नजरबंद करण्याचा मुशर्रफ यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात ते सध्या जामिनावर आहेत. खटल्याची पुढील सुनावणी 18 एप्रिल रोजी होणार आहे. मुशर्रफ उशिरा आल्यामुळे न्यायमूर्ती शौकत अजीज सिद्दिकी यांच्यासमोर त्यांच्या वकिलाने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. सुरक्षेच्या कारणावरून विलंब झाल्याचे सांगितले. परंतु त्यावर न्यायमूर्ती सिद्दिकी यांनी नाराजी व्यक्त केली. आम्ही येथे कोणाच्या प्रतीक्षेत बसलेलो नाहीत. त्यांनी वेळेवर येणे गरजेचे होते. कायद्याच्या नजरेत सगळे सारखे आहेत, असे सिद्दिकी म्हणाले. मुशर्रफ बुलेटप्रूफ जॅकेट घालूनच न्यायालय परिसरात दाखल झाले होते. वैयक्तिक पाच लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिनाचा कालावधी मंजूर झाला.