इंटरनॅशनल डेस्क - जग हे परंपरा, इतिहास, संस्कृती, मूर्तिकला व स्थापत्य यांसारख्या गोष्टींनी समृध्द आहे. परंतु आपल्याला माहीत आहे का, जगात अशा अनेक मूर्त्या आहेत ज्यांना पाहिल्यास आपल्या ती जिवंत असल्याचा भास होतो, असे वाटते की मूर्तिकाराने त्यात जीवच टाकला. या प्रकारच्या मूर्त्या सार्वजनिक उद्याने व अन्य ठिकाणी पाहावयास मिळतात.
बहुतेक ती क्रिएटिव्हली डिझाइन करण्यात आलेली असतात. यासाठी सिंगापूरच्या 'रिव्हर चिल्ड्रन' मूर्तीचे उदाहरण घेता येईल. पाच मुलांचा गट नदीत उड्या मारत आहे, अशी ती मूर्ति आहे. ती मुले जिवंत असल्याचा भास होतो. आपल्याला असेही म्हणता येईल, की पहिल्यांदाच पाहणारा माणूस त्यांना वाचवण्यासाठी धावलाही असता.
अशाच प्रकारचा इंग्लंडमध्ये 'लंडन इंक्स मॅन स्विमिंग स्टॅच्यू' बनवण्यात आला आहे. तो स्टॅच्यू लोकांचा आकर्षण केंद्र बनला आहे. divyamarathi.com आपल्याला अशाच काही वास्तवाची जाणीव करून देणारे जगातील 26 मूर्त्यांची छायाचित्रे दाखवणार आहोत.
पुढील छायाचित्रांमध्ये पाहा जगभरातील जिवंतपणाचा आभास निर्माण करणा-या मूर्त्या....