Home »International »Other Country» Cricket Bat With Blood Stains Fount In Oscar Pistorious House

'ब्‍लेड रनर'च्‍या घरात सापडली रक्ताळलेली बॅट, प्रेयसीच्‍या हत्‍याप्रकरणाला नवे वळण

वृत्तसंस्‍था | Feb 18, 2013, 10:30 AM IST

  • 'ब्‍लेड रनर'च्‍या घरात सापडली रक्ताळलेली बॅट, प्रेयसीच्‍या हत्‍याप्रकरणाला नवे वळण

जोहान्सबर्ग - जिद्द आणि चिकाटीचा आदर्श म्‍हणून अनेकांच्‍या हृदयात आदराचे स्‍थान मिळविलेला धावपटू ब्‍लेड रनर अर्थात ऑस्‍कर पिस्‍टोरियस प्रेयसीच्‍या हत्‍येप्रकरणी अडकण्‍याची शक्‍यता आहे. त्‍याच्‍या घरात रक्ताने माखलेली क्रिकेट बॅट आढळून आली आहे. त्‍यामुळे याप्रकरणाच्‍या तपासाला वेगळेच वळण मिळाले आहे.

'व्हॅलेंटाइन डे'ला पहाटे ऑस्‍करने प्रेयसी रीवा स्टीनकॅम्पवर गोळीबार केला होता. चोर समजून आपण गोळ्या झाडल्‍या, असे ऑस्‍करचे म्‍हणणे आहे. परंतु, त्‍याच्‍या घरात रक्ताने माखलेली बॅट आढळल्‍याचे वृत्त तपास अधिका-यांचा अहवाला देऊन एका वृत्तपत्राने दिले आहे. तपास अधिका-यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, रीवाची कवटी पूर्णपणे फुटली असून, बॅटवर मोठ्या प्रमाणात रक्तही आहे. हे रक्त रिवाचे आहे का, याची तपासणी करण्‍यात येत आहे. तसेच घटना घडली त्‍यावेळेस रिवा नाईटी घालून होती. त्यामुळे ऑस्‍करच्‍या दाव्‍यावर प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित होते. ऑस्‍करवर हेतूपरस्‍पर हत्‍या केल्‍याचा गुन्‍हा सिद्ध झाल्‍यास जन्‍मठेपेची शिक्षा होऊ शकते.

Next Article

Recommended