आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेक्सिकोच्या सागरकिनार्यावर वसलेले शहर मजटलानच्या एका अपार्टमेंटमध्ये कुप्रसिद्ध अमली पदार्थ तस्कर जोएक्विन एल चापो गुजमनला पोलिसांनी 22 फेब्रुवारीला अटक केली. गेल्या 13 वर्षांपासून त्याचा शोध सुरू होता. अमेरिका आणि मेक्सिकोच्या संयुक्त मोहिमेत सिनालोआ प्रांतातील ड्रग टोळीचा म्होरक्या पकडण्यात यश आले आहे.
मेक्सिकोमध्ये अनेक अशा टोळ्या सक्रिय आहेत. सरकारने सिनालोआ टोळीचा बीमोड करण्यास प्राधान्य दिले आहे. या टोळीचा अवैध कारभार 54 देशांमध्ये पसरला आहे. अमेरिका ड्रग अंमलबजावणी प्रशासन (डीईए) आता मेक्सिकोची नौसेना आणि मरिन्सच्या गटांसोबत काम करते. डीईएने खास गुप्तचर अमेरिका मेक्सिकोत गुजमनवर पाळतीसाठी नियुक्त केले होते.
अमेरिकेच्या माहितीच्या आधारे अनेक जागी छापा टाकल्यावर पोलिसांनी एका घराला घेरले. परंतु, गुजमन बाथटबच्या खाली बनवलेल्या भुयारातून निसटला. त्याच्या आठवडाभरानंतर जगातील हा एक मोठा तस्कर मजटलानच्या एका अपार्टमेंटमध्ये पकडला गेला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.