आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकिएव - युक्रेनचा दक्षिण भाग क्रिमियाच्या खासदारांनी रशियन संघ राज्यात सामील होण्याच्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले आहे. या निर्णयासाठी 16 मार्च रोजी सार्वमत घेतले जाईल, असे संसदेने स्पष्ट केले आहे. युक्रेनच्या काळजीवाहू सरकारने मतदान घटनाबाह्य ठरवले आहे.
युक्रेनमध्ये रशिया समर्थक सरकारच्या पतनानंतर रशियन भाषिक क्षेत्र क्रिमियावरून रशिया आणि युक्रेनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, क्रिमियातील संकट दूर करण्यासाठी रशिया आणि युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांची पहिली बैठक करण्यासाठी अमेरिकेने सुरू केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.