आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Criminal Case Hearing Continue Against Devyani Khobragade, American Law Adviser

देवयानी खोब्रागडे विरोधात गुन्हेगारी खटला चालणार,अमेरिकन विधी सल्लागारतर्फे अर्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - व्हिसामधील चुकीची माहिती दिल्याबद्दल देवयानी खोब्रागडे यांच्याविरोधात गुन्हेगारी स्वरूपाचा खटला चालवण्यासाठी अमेरिकन विधी सल्लागार कार्यालयाने न्यूयॉर्क न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. देवयानी यांना राजनैतिक संरक्षण नसल्याचे या दस्तऐवजात म्हटले आहे.
आपल्याविरुद्धचा खटला रद्द करण्यात यावा, असा अर्ज देवयानी खोब्रागडे यांनी दाखल केला होता. या अर्जाच्या विरोधात मॅनहटनचे फेडरल वकील प्रीत भरारा यांनी अमेरिकी सरकारच्या विधी सल्लागार कार्यालयाचे अ‍ॅटर्नी स्टीफन केर यांच्या स्वाक्षरीचा अर्ज शुक्रवारी दाखल केला. भरारा यांनी आपल्या दस्तऐवजासोबत हा अर्ज जोडला आहे. भारताच्या उपवाणिज्य दूत म्हणून देवयानी यांना पूर्णत: राजनैतिक संरक्षण नव्हते, त्यामुळे गतवर्षी 12 डिसेंबर रोजी त्यांना फेडरल अधिका-यांनी केलेली अटक योग्यच होती, असे या अर्जात नमूद करण्यात आले आहे.
खोब्रागडे यांना अटक केली त्या वेळी राजनैतिक संरक्षण नव्हते त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध खटला चालवता येऊ शकतो, असा दावा यामध्ये करण्यात आला आहे. आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ भरारा यांनी आठ कागदपत्रे सादर केली असून त्यामध्ये विधी सल्लागाराचेही मत आहे.
14 जानेवारी रोजी खोब्रागडेंचे वकील डॅनियल अर्शेक यांनी आरोपपत्र फेटाळून खटला रद्द करण्याची व देवयांनीचे प्रत्यार्पण रोखण्याची मागणी केली होती. देवयानी यांना राजनैतिक संरक्षणाचे कवच असल्याने त्यांच्याविरुद्ध अमेरिकेत खटला चालवता येत नाही, असे अर्शेक यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.