आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्यात कैद झालेल्या चित्रातून आरोपीचा माग काढता येणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - नाग-नागीण डिवचणा-या शत्रूंचे चित्र आपल्या डोळ्यात कैद करतात आणि नंतर त्यांचा सूड उगवतात, अशी एक दंतकथा आहे. वास्तवात अशाच तंत्रज्ञानावर काम सुरू आहे. या माध्यमातून पीडितेच्या डोळ्यात कैद चित्राच्या मदतीने गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. अपहरण किंवा लैंगिक अत्याचारादरम्यान आरोपी सर्वसाधारणपणे पीडितेचे छायाचित्र घेतो किंवा व्हिडिओ रिकॉर्ड करतो. याचा वापर खंडणीसाठी किंवा अन्य मागण्या करण्यासाठी केला जातो.
पहिला टप्पा। डोळ्यातील माहिती वेगवेगळी करणे
संशोधनामध्ये पाच लोकांच्या उपस्थितीत एका व्यक्तीचे छायाचित्र घेण्यात आले. शास्त्रज्ञांनी छायाचित्रातील डोळ्याचा भाग विभक्त केला. यामध्ये बरीच माहिती दडलेली होती. उदा : डोळ्याच्या कक्षेत किती लोक होते, व्यक्ती तेव्हा कुठे होती.
डोळे सांगतात, व्यक्ती कुठे आणि कुणासोबत आहे
डोळे काळ्या काचेप्रमाणे असतात. छायाचित्रणात तेथे उपस्थित व्यक्तीच्या डोळ्यातून ती कुठे आणि कोणासोबत होती हे कळते. गुन्हेगारी प्रकरणामध्ये हे तंत्रज्ञान उपयोगी ठरू शकते. पासपोर्ट साइजचा लहान फोटोही मोठ्या गुन्ह्याचे गुपित उघड करू शकतो. डॉ. एलिस जेंकिन्स, ग्लासगो विद्यापीठ