आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crowd Scuffled With Journalist At Madison Square

VIDEO: मेडिसन स्क्वेअरवर ज्येष्ठ पत्रकाराला धक्काबुक्की, काँग्रेसकडून तीव्र निषेध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - येथील मेडिसन स्क्वेअर गार्डनबाहेर एका ज्येष्ठ पत्रकाराला मोदी विरोधी असल्याचे सांगत मारहाण करण्यात आली. त्यासोबतच या पत्रकारांसोबत हुटिंग करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना धक्काबुक्की करण्यात आली. घटनेसंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्यानंतर त्याचा काँग्रेससह अनेकांनी तीव्र निषेध व्यक्त केला.
वृत्तवाहिन्यांवरील माहितीनुसार, राजदीप सरदेसाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा कव्हर करण्यासाठी भारतातून गेले आहेत. मोदी मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधीत करणार होते त्याआधी स्टेडियम बाहेर सरदेसाई त्यांच्या चॅनलसाठी वार्तांकन करत असताना ही घटना घडली आहे.

मेडिसन स्क्वेअर येथील मोदींच्या कार्यक्रमाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागेले होते. भारतीय पत्रकारावर अमेरिकेत हल्ला होण्याची घटना निषेधार्ह्य असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. काही लोकांनी आरोप केला आहे, की पत्रकार सरदेसाई यांच्यावर हल्ला करणारे मोदी समर्थक होते आणि त्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवले. काँग्रेस प्रवक्ते अजय माकन म्हणाले, मोदींच्या धोरणांना विरोध केल्यामुळे पत्रकार सरदेसाई यांना गद्दार ठरवून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हे निंदनीय कृत्य आहे. यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येते. दुसरीकडे, पत्रकाराने स्वतःच्या ट्विटर अकाउंटवर लिहिले आहे, की धक्काबुक्की करणार्‍यांना कॅमेरात कैद केले आहे. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी हा व्हिडिओ दाखवणे एकमेव उपाय आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, अमेरिकेत पत्रकारावरील हल्ल्याचा व्हिडिओ