आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cruise Ship Accident Happened Because Of Captain's Mistake

कॅप्‍टनच्‍या चुकीमुळेच 4200 प्रवाशांचा जीव आला होता धोक्‍यात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गिग्लियो (इटली) - इटलीच्‍या पश्चिम किनारपट्टीवर बुडलेल्‍या क्रुझ जहाजामधून आणखी दोन जणांचे मृतदेह ताब्‍यात घेण्‍यात आले आहेत. त्‍यामुळे आता या घटनेतील मृतकांची संख्‍या 5 झाली आहे. चालकदलासह 17 प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत. जहाजाचा कॅप्‍टन फ्रान्‍सेस्‍को शे‍टीनो याच्‍या अक्षम्‍य चुकांमुळे अपघात झाल्‍याचे सांगण्‍यात येत आहे.
पाण्यावर तरंगत असलेल्या जहाजाची कसून तपासणी केली जात आहे. जहाजाच्या कॅप्टनच्या चुकीमुळे हा अपघात झाला असल्याची माहिती जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. जवळपास ४,२०० प्रवासी आणि कर्मचारी असलेले हे जहाज बुडत असताना कॅप्टन आधीच जहाज सोडून पळून गेला होता. जहाजाचा कॅप्‍टन हा सर्वात शेवटी जहाज सोडून जातो. असे असतानाही तो सर्वात आधी पळाला. एवढेच नव्‍हे तर अपघात घडला त्‍यावेळी तो किना-यावर उभा असलेल्‍या मित्राला सॅल्‍युट करण्‍यासाठी उभा होता. या प्रयत्‍नातच जहाज खडकाला धडकले. तसेच शेटीनोच्‍या जहाज हताळण्‍यावरही अनेक प्रश्‍न निर्माण करण्‍यात आले आहे.
कॅप्टनला आधीच मनुष्यवधाच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.