मंडाले - म्यानमारच्या मंडाले शहरात बौद्ध आणि मुस्लिम नागरिकांमध्ये उसळलेल्या दंगलीत दोन ठार झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
शहरातील प्रमुख मार्गावर पोलिस गस्त घालत आहेत. हिंसक जमावामुळे अनेक दुकाने बंद झाली. गेल्या दोन दिवसांपासून दोन्ही समाजांमध्ये हिंसाचार उसळला आहे. गुरुवारी सकाळी उसळलेल्या चकमकीत दोन्ही गटांचा प्रत्येकी एक नागरिक ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
परिस्थिती चिघळू नये यासाठी सकाळी 9.00 ते 5.00 या वेळात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 2012 पासून बौद्ध आणि मुस्लिम धर्मीयांमध्ये दंगलीच्या विविध घटना घडत आहेत. बहुतांश वेळा मुस्लिम धर्मीयांवर निशाणा साधला जातो. या चकमकीत आतापर्यंत 250 मुस्लिमांचा मृत्यू झाला असून हजारो बेघर झाले आहेत. बलात्काराच्या घटनेनंतर बौद्ध नागरिकांनी मंगळवारी रात्री उपनगरातील मुस्लिमांच्या दुकानांची तोडफोड करण्यात आली. बुधवारी सकाळी सुरक्षा रक्षकांनी दंगेखोरांवर रबरी गोळ्या झाडल्या. अनेक सुधारणा केल्या आहेत.