आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Curiosity rover to land on mars monday morning 8 am ist

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : जगातील सर्वात महागडे 'क्युरिऑसिटी 'उद्या उतरणार मंगळावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नासाच्या मार्स सायन्स लॅबोरेटरी( एमएसएल) अभियानाबद्दल जगातील सर्वांची उत्सुकता शिघेला पोहचली आहे. एमएसएल म्हणजे क्युरिओसिटी रोव्हर भारतीय वेळेनुसार सहा ऑगस्टला सकाळी 8 वाजता मंगळ ग्रहावर पोहचणार आहे. 138 अब्ज रूपये खर्च करण्यात आलेल्या या अभियानाचे यश सोमवारी सकाळी होणार्‍या लॅडिंगवर अवलंबून आहे. नासाचे हे सगळ्यात महागडे अवकाश अभियान आहे.
लॅडिंगच्या प्रसारणासाठी देखील नासाने खास तयारी केली आहे. नासा रोव्हर लॅडिंगचे थेट प्रसारण करणार आहे.
न्यूयॉर्कच्या लोकांना मंगळवारी 6 ऑगस्टला 'रोव्हर'चे लॅडिंग लाईव्ह दिसणार आहे. शहरातील 'टाईम्स स्व्केअर' येथे एक मोठा पडदा लावण्यात आला आहे. या पडद्यावर 'रोव्हर'च्या लॅडिंगचे थेट प्रक्षेपण दाखवेल जाणार आहे. रविवारी प्रकाशित करण्यात आलेल्या नासाच्या रिपोर्टनुसार क्युरिओसिटी रोव्हर आपल्या मार्गावर आहे आणि मंगळाच्या दिशेने पुढे जात आहे. सध्या क्युरिओसिटीच्या मार्गात कुठलेही अडथळॆ नाही. क्युरिऑसिटीच्या सर्व सिस्टिम योग्य प्रकारे काम करत असल्याचे नासाने ताज्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
मंगळ ग्रहावर धुळीचे वादळ, कसे उतरणार यान 'मार्स रोव्हर' ?