आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटांचे टपाल आल्याने सगळेच बुचकळ्यात!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो - टपालपेटीतून पत्राऐवजी थेट नोटांचे बंडल आले, तर कुणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. स्वप्नातही कुणी अशी कल्पना केली नसेल, पण जपानमध्ये हे प्रत्यक्षात घडले आहे. टोकियोच्या नैर्ऋत्येकडील इकोमा परिसरात एका अपार्टमेंटमधील 30 कुटुंबांच्या लेटरबॉक्समध्ये येन या जपानी चलनाच्या नोटा मिळाल्या.

अधिक माहितीनुसार, 20-21 मार्च रोजी या कुटुंबांच्या नावाने एकूण 4 लाख 49 हजार 270 रुपये किमतीची बंडले टाकण्यात आली. यातील सर्वात मोठे बंडल 80 हजार, 986 रुपयांचे होते. काही जणांच्या घरी आलेल्या पार्सलमध्ये जाहिरात पुस्तिकांमध्ये लपेटलेली नाणीही सापडली. काहींना गिफ्ट व्हाउचर्सही मिळाले. इकोमा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश लोकांनी हे अचानक मिळालेले पैसे घेण्यास नकार दिला, तर त्यापैकी काहींनी ही घटना खूप विचित्र असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. हे पैसे नेमके कुणी टाकले, याविषयी अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पोलिस सध्या ‘हरवलेल्या-सापडलेल्या’ या वर्गवारीनुसार या घटनेचा तपास करत आहेत. विशेष म्हणजे 10 दिवसांपूर्वी टोकियोतील दक्षिण कावासाकी येथील 30 कुटुंबांनाही अशाच प्रकारची नोटांची बंडले मिळाली होती.