आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सायबर हल्ल्यामागे चिनी विद्यापीठातील संशोधक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - अमेरिकेवर सायबर हल्ल्यामागे चीनमधील एका आघाडीच्या विद्यापीठातील संशोधकांचा हात आहे. विद्यापीठातील संशोधकांनी चिनी लष्कराला मदत केल्यामुळे हॅकिंगच्या घटना वाढल्याचे एका ऑनलाइन शोध प्रबंधाद्वारे स्पष्ट झाले आहे. शांघायमधील जिआटाँग विद्यापीठातील संशोधकांनी अभ्यास करून हॅकिंगसाठी लष्कराला मदत केली आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) एका विभागाने प्रत्यक्षात हॅकिंग केल्याचे दिसून आले आहे, असा दावा प्रबंध लेखकाचा आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेनेही काहीसा असाच आरोप केला होता. सातत्याने होणार्‍या सायबर हल्ल्यामागे शांघायमधील कमर्शियल हब असल्याचे अमेरिकेने म्हटले होते.

(छायाचित्र - संग्रहित)