आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर हेरगिरीच्या मोठय़ा कटाचे अमेरिका लक्ष्य; काँग्रेसमध्ये मांडला अहवाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिका मोठय़ा सायबर हेरगिरीच्या कटाचे देश लक्ष्य बनल्याचे अमेरिकी सरकारने सोमवारी काँग्रेसमध्ये मांडलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे. हा अहवाल देशाच्या गुप्तहेर संस्थेने दिला आहे.

चीनने आर्थिक पातळीवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून पद्धतशीरपणे हेरगिरीचा कार्यक्रम राबवला आहे. हा एक मोठा कट आहे. अमेरिकेला ऊर्जा, अर्थ, माहिती-तंत्रज्ञान, अंतराळ विज्ञान आदी क्षेत्रात पिछाडीवर टाकण्यासाठी चीनने ही सायबर मोहीम राबवली. चीनने केलेल्या हॅकिंगमुळे देशाचे नेमके किती आर्थिक नुकसान झाले आहे, याची माहिती सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नसली तरी नुकसानीची बाब मान्य करण्यात आली आहे, अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे. हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षिततेशी संबंधित आहे. त्यामुळे त्याचा सर्व पातळ्यांवर निषेध होणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.