आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cyber Criminals Hacked Smart Freez, Calfornia Proofpoint Agency Report

सायबर चाच्यांनी हॅक केला स्मार्ट फ्रिज,कॅलिफोर्नियाच्या प्रूफपॉइंट संस्थेचा अहवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - स्पॅम ई-मेल्स पाठवण्यासाठी सायबर गुन्हेगार स्मार्ट फ्रिजचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असल्याचे दिसून आले आहे. सायबर गुन्हेगार दररोज साधारण 1 लाख उपकरणे हॅक करतात. यामध्ये स्मार्ट अप्लायन्सेसचा वापर संशोधकांना पहिल्यांदाच आढळून आला आहे.
एक लाख कंझ्युमर गॅझेटमधून साधारण 75000 अनावश्यक ई-मेल्स पाठवले जातात. मल्टिमीडिया सेंटर्स, टेलिव्हिजन आणि किमान एका रेफ्रिजरेटरचा हॅकिंगसाठी वापर केला जात असल्याचे संशोधकांना दिसून आले आहे. रोबो साधर्म्य रोबोनेट्सचा वापर असलेल्या संगणकातून मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले केले जात असल्याचे स्पष्ट झाले. स्मार्ट अप्लायन्सेस तसेच इंटरनेट ऑफ थिंग्जच्या (आयओटी) माध्यमातून सायबर हल्ले घडवले जातात. कॅलिफोर्निया येथील प्रूफपॉइंट सुरक्षा गटाच्या संशोधकांनी यावर संशोधन केले आहे. 23 डिसेंबर 2013 ते 6 जानेवारी 2014 दरम्यान झालेल्या सायबर हल्ल्याचा त्यात अभ्यास करण्यात आला. हॅकिंगसाठी पारंपरिक लॅपटॉप्स, मोबाइल डिव्हाइस, डेस्कटॉप कॉम्प्युटर्सचा वापर करण्यात आला नाही. त्याऐवजी मल्टिमीडिया सेंटर्स, टीव्ही आणि किमान एका रेफ्रिजरेटर्सचा वापर करण्यात आल्याचे दिसून आले.