आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cyclist Rides Bicycle Backwards 337 KM In 24 Hours

जबरदस्त स्टॅमिना: सलग 24 तास 337 किलोमीटर चालवली त्याने उलटी सायकल!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियातील एंड्रीव्ह हेलिंगा याने सलग 24 तास उलटी सायकल चालवून गिन‍िज बुकमध्ये स्वत:चे नाव नोंदवले आहे. बक्षिसी मिळालेली रक्कम त्याने जाम्बियामधील गरीब मुलांमध्ये वाटून दिली आहे. गरीब मुलांना मदत करून एंड्रीव्ह जाम खुश आहे. सलग 24 तास तब्बल 337 किलोमिटर उलटी सायकल चालवली. यादरम्यान तो त्याच्या साथीदार्‍यासोबत संभाषणही करत होता. एंड्रीव्हला वाटत होते, तो केवळ 300 किमी अंतर पार पाडू शकेल. परंतु समाजाचं आपण काही देणं लागतो, या भावनेतून त्याने 337 किमी अंतर पार करून विश्वविक्रम केला. उलटी सायकल चालवणे काही गंमत नाही. मात्र एंड्रीव्ह याने विपरित हवामानातही हसत-हसत आव्हान पूर्ण केले. ही स्पर्धा 'चॅलेंज फॉर चेंज' या ग्रुपने आयोजित केली होती.

एंड्रीव्ह याला दहा हजार डॉलर मिळाले. बक्षिसाची रक्कम त्याने जाम्बिया येथील गरीब मुलांना वाटून टाकले. एंड्रीव्ह म्हणाला, 'चॅलेंज फॉर चेंज'च्या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून जगभरातील जनता जाम्बिया येथील गरीब मुलांचे मदत करू शकता.

एंड्रीव्ह याला त्याचा मित्र रेड एन्डर्टन याच्याकडून प्रेरणा मिळाली होती. त्याने 37 दिवसांत संपूर्ण देशात सायकल चालवून विश्वविक्रम केला होता. त्याला मिळालेल्या बक्षिसाची रक्कम गरीब मुलांमध्ये वाटली होती.

सलग 24 तास उलटी सायकल चालवणार्‍या एंड्रीव्ह हेलिंगाचा कारणामा पाहण्यासाठी पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करा...