आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंडन - पाच वर्षांच्या मुलीने 11 कोटी वर्षांपूर्वीच्या डायनासोरचा शोध लावला. त्या डायनासोरला या मुलीचे नाव देण्यात आले आहे. डेझी मॉरिस या मुलीला 2009 मध्ये ब्रिटनच्या ऑइल ऑफ विट बेटाच्या किनार्यावर या डायनासोरचे अवशेष आढळले होते. डायनासोरची ही प्रजाती उडणारा सरिसृप असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. याचे नाव वेक्टीड्रेको डेजीमॉरिस ठेवण्यात आले आहे. अवशेषतज्ज्ञ मार्टिन सिंपसन म्हणाले, हा जीव कावळ्याच्या आकाराचा असावा. त्या वेळी युरोपमध्ये वेगवेगळ्या आकाराचे उडणारे सरिसृप होते हे यातून सिद्ध होते. डेझी मॉरिस आता नऊ वर्षांची आहे. चार वर्षांपूर्वी ऑइल ऑफ विटच्या आर्थरफील्ड किनार्यावर फिरत असताना तिच्या पायाला डायनासोरचे अवशेष लागले. मॉरिस कुटुंबीय ते घेऊन साऊथम्पटन विद्यापीठात पोहोचले. तेथील ‘फॉसिलमॅन’ मार्टिन सिंपसन यांनी हे एक माठे संशोधन असल्याचे म्हटले. अवशेष डेझीला सापडले नसते तर ते वाहत गेले असते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.