इंटरनॅशनल डेस्क - रविवारी ( ता. 6 )
दलाई लामांनी 80 व्या वर्षात पर्दापण केले.14 वे दलाई लामा तेनजिन ग्यात्सो तिबेटचे राष्ट्राध्यक्ष आणि आध्यात्मिक गुरू आहेत. लामांचा जन्म 6 जुलै 1935 साली तिबेटमधील एका शेतकरी कुटूंबात झाला. 6 व्या वर्षापासून दलाई लामांनी आपले अध्ययन सुरू केले. 1949 मध्ये तिबेटवर चीनने हल्ला केला आणि वर्चस्व निर्माण केले. 1959 नंतर लामांना निर्वासिताचे जीवन जगावे लागले. त्यांनी जगभर दौरे करून शांततेचा पुरस्कार केला. तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसक मार्गाने संघर्ष चालू ठेवल्याने त्यांना 1989 मध्ये शांततेचे नोबेल पुरस्कार देण्यात आले. लामांच्या जन्मदिना निमित्त आम्ही तुम्हाला त्यांची न पाहिलेली छायाचित्रे दाखवणार आहोत.