आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : चीनकडून जीव वाचवत यांनी भारतात घेतला होता आश्रय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील चौथा मोठा धर्म म्हणून बौद्ध धम्माकडे पाहिले जाते. जगभरात 375 लाख बौद्ध अनुयायी आहेत. या धर्माच्या धर्मगुरुला दलाई लामा म्हणतात. सध्या 14 वे दलाईलामा तेनजिन ग्यात्सो हे तिबेटचे धर्मगुरु आहेत. ते तिबेटचे राष्ट्राध्यक्ष देखील आहेत. गेल्या सहा जुलैला त्यांचा वाढदिवस होता.

1959 मध्ये तरुण दलाईलामांनी चीनच्या भीतीने तिबेटमधून पलायन केले आणि भारतामध्ये आश्रय घेतला होता. भारतातील धर्मशाळा येथे ते राहातात. असे बोलले जाते की, दलाईलामांना भारताने आश्रय देणे चीनला रुचले नाही आणि भारताला 1962 च्या युद्धाला सामोरे जावे लागले.

धर्मशाळा येथे आश्रय घेतलेल्या दलाईलामांच्या दर्शनासाठी जगभरातील अनुयायी भारतात येते असतात.