आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मन दृढ असल्यास फेसबुक-ट्विटरचा परिणाम नाही; तंत्रज्ञानाला दोष देणे चुकीचे- धर्मगुरू दलाई लामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिबेटी नागरिकांचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा मानतात, तिबेटचा मुद्दा आजही जिवंत आहे. अमेरिकेने हा मुद्दा विस्मृतीत टाकला, हा प्रश्न ते फेटाळून लावतात. त्यांच्या मते तंत्रज्ञानाचा फायदा-तोटा त्याच्या वापरावर अवलंबून आहे. चीनच्या न्यायव्यवस्थेत सुधारणा व्हावी, असे त्यांना वाटते. टाइमशी त्यांनी केलेल्या चर्चेचा काही भाग ‘दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी..
चीन महत्त्वपूर्ण आर्थिक शक्ती बनल्यानंतर मानवी हक्कांशी संबंधित बीजिंगच्या मुद्यांकडे अमेरिकेने दुर्लक्ष केले आहे का?
0 मला नाही वाटत असे काही आहे. स्वातंत्र्य, लोकशाहीचा पाठीराखा आहे अमेरिका. काही लोकांसाठी पैशांना जास्त महत्त्व आहे. हे चुकीचे आहे. आफ्रिका, सिरियाकडे पाहा. नैतिक सिद्धांताअभावी मानवी जीवनाला काही मूल्य राहिलेले नाही. नैतिकता आणि सत्याशिवाय भविष्यच नाही.
तुमच्या मते पोप फ्रान्सिस आणि कॅथॉलिक चर्चा महिलांच्या बौद्ध धर्माकडून काय शिकत आहेत?
0 प्रत्येकाने आपापल्या पारंपरिक मार्गाने चालावे. काही वेळा आपल्याला नव्या संदर्भांचाही विचार करावा लागतो. उदा. महिलांचे हक्क अतिशय महत्त्वाचे आहेत. पोप अत्यंत व्यावहारिक आणि कडक आहेत. सतत राजेशाही थाटात राहणार्‍या एका र्जमन धर्मगुरूला काढून टाकण्याचा पोपचा निर्णय कौतुकास्पद आहे.
भारत-चीनमधील स्पर्धा आशिया आणि तिबेटी लोकांच्या मागण्यांसाठी योग्य आहे?
0 मुळीच नाही. परस्पर विश्वासावर आधारित वास्तविक मधुर संबंधच आर्थिक विकास, शिक्षण, आध्यात्मिक क्षेत्रासाठी महत्त्वाची भूमिका करू शकतात. त्यामुळे भारत आणि चीनदरम्यान विश्वास निर्माण व्हायला हवा.
फेसबुक आणि ट्विटर आपला आनंद वाढवतात की हे प्रकार आपल्याला हानिकारक आहेत?
0 ते वारणार्‍यावर अवलंबून आहे. व्यक्तीत शक्ती किंवा आंतरिक विश्वास असेल तर काही अडचण नाही. मात्र कमजोर मनाच्या माणसासाठी अयोग्य आहे. अशा स्थितीत भ्रम तयार होतो. तंत्रज्ञानाला दोष देऊन चालणार नाही.
चीनचे नवीन अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबद्दल आपल्याला काय वाटते?
0 भ्रष्टाचाराच्या विरोधात ते कडक पावले उचलत आहेत. त्याचबरोबर खरा विकास ग्रामीण भागात झाला पाहिजे. नवीन आणि मोठय़ा शहरांची निर्मितीने समस्या सुटणार नाहीत. एक अब्ज तीस कोटी चिनी नागरिकांना वस्तुस्थिती जाणून घेण्याचा अधिकार आहे. सेन्सॉरशीप एक अवास्तविक प्रक्रिया आहे. त्यातून अविश्वास आणि संशय निर्माण होतो. चीनची न्यायव्यवस्था आंतरराष्ट्रीय पातळीची बनवण्याची नितांत आवश्यकता आहे. असे झाले तरच एक अब्ज गरीब चिनी नागरिकांना कोणत्याही प्रकारची आवश्यक सुरक्षितता मिळण्यास मदत होईल.