आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिरियात टीव्ही निवेदकाची हत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दमास्कस - सिरियात एका टीव्ही निवेदकाची अपहरण व हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. अगोदर मागील महिन्याच्या मध्यावर त्याचे अपहरण करण्यात आले होते.
मोहंमद अल-सइद असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.सइद हे सिरियाच्या सरकारी टीव्हीवरील परिचित चेहरा होते. त्यांची हत्या झाल्याचा दावा अल-नुसरा फ्रंटच्या वतीने करतानाच त्यांच्या हत्येचीही जबाबदारी या गटाने घेतली आहे. सिरियातील राजकीय घडामोडींचे निरीक्षण करणा-या मानवी हक्क विषयक संघटनेचे रामी अब्देल रहेमान यांनी ही माहिती दिली आहे. अल-नुसरा ही इस्लामी दहशतवादी संघटनेने हा दावा केला आहे. सइद यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांना ठार करण्यात आले, असे नुसराने शुक्रवारी पत्रकाद्वारे स्पष्ट केले. पत्रकासोबत या गटाने सइद यांचे भेदरलेल्या अवस्थेतील एक छायाचित्र देखील जारी केले. ते नेमके कोणत्या ठिकाणी आहेत. हे मात्र समजू शकलेले नाहीत. जे सरकारी सैन्याला पाठिंबा देत आहेत, त्यांच्यासाठी हा संदेश असल्याचेही गटाने नमूद केले आहे.
दरम्यान, संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी सिरियावरील ठरावासाठी मतदान घेण्यात आले. परंतु या सभेला भारतासह 31 देशांच्या प्रतिनिधींची अनुपस्थिती होती. सिरियावर राजकीय निर्बंध टाकण्यात यावेत, अशी भूमिका प्रस्तावात मांडण्यात आली आहे. या भूमिकेचे शुक्रवारी 193 पैकी 133 देशांकडून समर्थन करण्यात आले होते.
अलेप्पोमध्ये 13 ठार : अलेप्पो व दमास्कस परिसरात शनिवारी झालेल्या धुमश्चक्रीत 13 जण ठार झाले. देशातील ही दोन्ही मोठी शहरे आहेत. अलेप्पोमध्ये बंडखोरांनी सरकारी टीव्हीच्या इमारतीमध्ये स्फोटके ठेवली होती. त्यानंतर सरकारी फौजांनी ही इमारत ताब्यात घेतली. त्यानंतर बंडखोरांनी हा भाग सोडला. बंडखोर ही इमारत ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना लष्करासोबत त्यांचा संघर्ष उडाला.