आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dangerious Pakistan : Anyone Take Ak 47 , Machingan

धोकादायक पाकिस्‍तान : कोणी एके-47 घ्या, कोणी मशीनगन घ्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानात सुरक्षेच्या नावाने अगोदरच काहीही आलबेल नसताना देशात प्रतिबंधित असलेल्या शस्त्रास्त्रांचे खुलेआम परवाने वाटप करण्यात आल्याचे उघड झाले आहे. गेल्या पाच वर्षांत सुमारे 69 हजार परवाने देण्यात आले. बंदुकीपासून मशीनगनपर्यंत सर्व काही वापरण्यास परवानगी दिली गेल्याची माहिती समोर आली आहे.

देशाच्या संसदेत गृहमंत्री रहेमान मलिक यांनी या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली. केंद्र सरकारने 69 हजार 473 प्रतिबंधित शस्त्रांचे परवाने देऊन टाकले. 2008-12 या काळात हा प्रकार घडला आहे. एके-47, सब मशीनगनसारख्या शस्त्रांचे परवानेही फारशी खातरजमा न करता देण्यात आल्याची धक्कादायक माहिती संसदेत मांडण्यात आली. गुरुवारी संसदेत एका लेखी उत्तरात परवान्याचा हा तपशील सादर करण्यात आला. 2008 मध्ये 11 हजार 776, 27 हजार 551 (2009), 5 हजार 789 (2010), 8 हजार 369 (2011), 15 हजार 988 (2012) अशा चढत्या क्रमाने परवाना वाटप झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरवर्षी हा आकडा वाढत चालला आहे. अब्दुल कादीर पटेल यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या संसदीय स्थायी समितीने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

खासदारांची कृपा
देशात सामान्य नागरिकाने काही शस्त्रास्त्रे वापरण्यास कायद्याची मनाई असताना कायदा करणा-या काही खासदारांनीच आपल्या मर्जीतील लोकांना अशी शस्त्रे मिळवून दिली आहेत. त्यांच्या शिफारशीमुळे बेकायदा वाटप झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.

दहशतवाद्यांनाही वाटप
बंदी असलेल्या लष्कर-ए-झांगवीच्या म्होरक्याला 11 परवाने देण्यात आले होते, याचाही गौप्यस्फोट झाला आहे. या दहशतवादी संघटनेने क्वेट्टामध्ये याचवर्षी 200 जणांची हत्या केली होती. झांगवीचा म्होरक्या मलिक इसहाक व त्याच्या मुलाने वेगवेगळ्या राज्यांतून असे परवाने मिळवले आहेत. बलुचिस्तानमध्ये असे परवाने कसे देण्यात आले, याची चौकशी होणार आहे.पंजाब सरकारने देशाचे गृहमंत्री रहेमान मलिक यांच्याकडे विचारणा केली आहे. पंजाब राज्याच्या पोलिसांच्या विशेष दलाने ही मागणी लावून धरली आहे.