आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dating Will Change Your Life Issue At Washington

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जोडप्याबरोबर डेटवर जा, प्रेमाची उत्कटता वाढवा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- या व्हॅलेंटाइन डेला तुम्ही दोघे कँडल लाइट डिनरला जाण्याचा विचार करत आहात? त्याऐवजी एखाद्या जोडप्याबरोबर डेटवर जा! एखाद्या जोडप्याबरोबर तुम्ही जोडप्याने डेटवर जाण्यामुळे तुमच्या स्वत:च्या नात्याला नवीन ऊर्जा मिळते आणि त्यात पुन्हा उत्कटता निर्माण होते, असे एका संशोधनात आढळून आले आहे.
अन्य एखाद्या जोडप्याबरोबर मैत्री करून डेटवर गेल्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनातील खासजी बाबींवर विस्ताराने चर्चा करता त्यामुळे तुमच्या जोडीदाराच्या तुम्ही अधिक जवळ जाता, असे संशोधकांनी म्हटले आहे. नात्यातील नावीन्य कमी होऊ लागले की प्रेमातील उत्कटताही हळूहळू कमी व्हायला लागते. तोच तोपणा नकोसा वाटायला लागतो. त्यामुळे अनुभवांची देवाणघेवाण आणि परस्पर संवादामुळे उत्कट प्रेमाच्या भावनांना नवीन उभारी मिळते, असे वेन प्रांतिक विद्यापीठातील संशोधक कीथ वेल्केर यांनी म्हटले आहे. आपल्या खासगी जीवनातील अनुभवांची अन्य जोडप्यांशी देवाणघेवाण केल्यामुळे उत्कट प्रेमभावनेला बळकटी मिळते.