आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिकागो- लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी डेव्हीड हेडलीचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास अमेरिकेने नकार दिला आहे. हेडलीचे कोणत्याही देशाकडे प्रत्यार्पण करणार नाही. त्याऐवजी हेडलीने दिलेली माहिती इतर देशांनी मागितल्यास देण्यात येईल, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अमेरिकेत शिकागो येथील न्यायालयात सुनावणी झाली. याप्रकरणी हेडलीचा साथीदार तहव्वूर राणाला शिक्षा ठोठाविण्यात आली आहे. तर डेव्हीड हेडलीला लवकरच शिक्षा सुनावली जाणार आहे. त्याला किमान 30 ते 35 वर्षांची शिक्षा द्यावी, अशी मागणी अमेरिकेने न्यायालयात केली आहे. हेडलीचा मुंबई हल्ल्यात सहभाग होता. त्याने हल्ल्यासंदर्भात माहिती गोळा करुन हा कट तडीस नेण्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. परंतु, त्याचे भारताकडे प्रत्यार्पण करणार नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे. हेडलीने सुनावणीदरम्यान सहकार्य केले. त्याच्यामुळेच राणाला शिक्षा दोषी ठरविता आले. गरज पडल्यास परदेशातील तपास यंत्रणांना व्हिडिओ कॉन्फरंसिंग किंवा पत्रव्यवहाराच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तयार असल्याचेही हेडलीने मान्य केले आहे. त्यामुळे त्याला फाशीऐवजी 30 ते 35 वर्षांच्या शिक्षेची मागणी करण्यात आली आहे.
काही महिन्यांपूर्वी भारतीय अधिका-यांना हेडलीची चौकशी करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यावेळी त्याची भारताने चौकशीही केली होती. त्याने भारतीय अधिका-यांना महत्त्वाची माहिती दिल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.