आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dead Bodies Of Murdered Miss Honduras And Her Sister Found Boyfriend Arrested

बहिणीच्या प्रियकराने पहिले मिस होंडुरसवर झाडल्या गोळ्या, नंतर नदी किनारी केले दफन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांता बार्बरा - मिस होंडुरस असेलली मारिया लंडनमध्ये होणार्‍या मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी होणार होती, त्याआधीच तिच्या बहिणीसह तिचा मृतदेह आढळला आहे. बॉयफ्रेंडनेच तिची हत्या केल्याचे तपासत निष्पन्न झाले आहे.
मिस होंडूरास मारिया जोस अॅल्व्होरडो आणि तिची बहीण सोफिया सात दिवसांपूर्वी एका बर्थ डे पार्टीला गेल्या होत्या, तेव्हा पासून दोन्ही बहिणी बेपत्ता होत्या. पोलिसांनी या प्रकरणी सोफियाच्या बॉयफ्रेंडला अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 19 वर्षीय मारिया आणि 23 वर्षांची सोफिया यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांना एका नदी किनारी त्यांचे मृतदेह दफण करण्यात आले. मिस होंडुरस असेलली मारिया लंडनमध्ये होणार्‍या मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी होणार होती.
पोलिसांनी सांगितले, की सोफियाचा बॉयफ्रेंड प्लुटेरेको अँटोनियो रुईजने गुन्हा कबुल केला आहे. त्याने सांगितले, की सोफिया दुसर्‍या एकासोबत डान्स करत होती, ते पाहून मला राग आला. त्यामुळे मी तिच्यावर गोळ्या झाडल्या. त्या ठिकाणाहून पळ काढणार्‍या मारियालाही मी संपवले. नंतर दोघींचे मृतदेह नदी किनारी पुरले. मृत दोघा बहिणीच्या आईने सांगितले, दुसर्‍या दिवशी प्लूटेरेको घरी आला आणि सांगू लागला की, रात्री पार्टी संपल्यानंतर दोघी बहिणी एका कारमध्ये बसून निघून गेल्या.
पुढील स्लाइडमध्ये संबंधीत घटनेसंबंधी छायाचित्र..