आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्मृती जपण्‍यासाठी मृत व्यक्तीच्या राखेतून चित्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अमेरिकेतील फ्लोरेन्समध्ये राहणा-या सर्गियो पोर्टिलिओ या चित्रकाराने मृत व्यक्तीच्या आठवणी चिरकाळ स्मृतीत ठेवण्याकरिता तिच्या नातेवाइकांसाठी एक अनोखी सेवा द्यायला सुरुवात केली आहे. मृत व्यक्तीच्या राखेपासून तो कॅन्व्हासवर अशी काही कलाकृती चितारतो की ती नेहमीसाठी आपल्या नजरेसमोर राहते.

मृत पाळीव प्राण्यांच्या हाडांच्या राखेपासून मेमोरियल पेंटिंग तयार करण्यापासून सर्गियोने या कलेची सुरुवात केली. मृत प्राणी पेंटिंगच्या स्वरूपात नेहमीसाठी त्यांच्या मालकांसोबत राहावेत, असे त्याला वाटायचे. माझ्यासाठी ही कलाकृती म्हणजे संबंधित व्यक्तीच्या अतिरिक्त आठवणी असतात, असे तो म्हणतो. आपला माणूस गमावल्याचे
दु:ख या चित्राद्वारे काही प्रमाणात कमी केले जाऊ शकते, असे त्याचे मत आहे. तो म्हणतो की, या चित्राच्या माध्यमातून तो मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना एका चिरकाळ टिकणा-या श्रद्धांजलीच्या रूपात सेवा देत आहेत.